facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / संजय राऊतांवर शिवसैनिकानंच फेकली शाई

संजय राऊतांवर शिवसैनिकानंच फेकली शाई

लखनऊमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेनं लखनऊमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत हा प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्याच कार्यकर्त्यानं संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सतर्कतेमुळे शाई अंगावर न पडता रस्त्यावर पडली आहे. संजय राऊत यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं शाई फेकल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. मात्र शिवसैनिकानंच संजय राऊत यांच्यावर शाई का फेकली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *