facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
Shopian: Army soldiers take positions during a gunbattle with Lashkar-e-Taiba militants at Kaddar forest area of Kellar in Shopian district on Thursday. PTI Photo (PTI1_15_2015_000138B)
Shopian: Army soldiers take positions during a gunbattle with Lashkar-e-Taiba militants at Kaddar forest area of Kellar in Shopian district on Thursday. PTI Photo (PTI1_15_2015_000138B)

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू- पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे गोळीबार केला. भारतीय जवानांनी याला चोख उत्तर दिले. मंगळवारी सकाळी ५.१५ वाजण्याचा सुमारास हा गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानने मंगळवारी नियंत्रण सीमा रेषेवरून राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील तीन भागांमध्ये गोळीबार केला. भारतीय जवानांच्या तळावर आणि काही परिसरात हा गोळीबार करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी तोफ गोळे तसेच काही शस्त्रांचा वापर केल्याची माहिती अधिका-यांकडून मिळते.

भारताने पाकला चोख प्रत्त्युतर दिल्यानंतर हा गोळीबार थांबला.  या गोळीबारात पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पाकिस्तानकडून होणा-या या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमेवर रहाणा-या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या सैनिकांनी सोमवारी देखील चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *