facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / रिंग रोड हरकतींची सुनावणी झाली पूर्ण
13516340_115290022235705_871404053873110509_n

रिंग रोड हरकतींची सुनावणी झाली पूर्ण

आवाज न्यूज लाईन

पुणे : महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित रिंग रोडवर आलेल्या हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, संबंधित अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
‘पीएमआरडीए’ व ‘एमएसआरडीसी’च्या प्रस्तावित रिंग रोडवर नगर विकास विभागाकडे मोठ्या प्रमाणात हरकती आल्या होत्या. या हरकतींची विभागाने सुनावणी घेतली. सुनावणीनंतर आता नगरविकास विभागामार्फत शिफारशींसह अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक योजनेतील (आरपी) प्रस्तावित रिंग रोडमध्ये वीस टक्के बदल करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने नव्याने अर्धवर्तुळाकार रिंग रोडची आखणी केली आहे. हे दोन्ही रिंग रोड एकमेकांना पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येऊन मिळतात. या दोन्ही रिंग रोडला राज्य सरकारने मान्यता देऊन त्यावर हरकती-सूचना मागविल्या. या दोन्ही रिंग रोडवर आठशेहून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकती स्वीकारण्याची मुदत संपल्यावरही काही हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे सुनावणीस दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

 सुनावणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यावर आता नगररचना विभागाकडून शिफारशी केल्या जाणार आहेत. त्यासंबंधीचा अहवाल तयार करून तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे महिन्याभरात पाठविला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

रिंग रोडमुळे पुन्हा विस्थापन?
रिंग रोडला काही भागांत विरोध झाला आहे. न्यू अहिरे या पुनर्वसन वसाहतीमधून रिंग रोड जाणार आहे. या गावाचे ‘एनडीए’मधून विस्थापन झाले आहे. या रिंग रोडमुळे न्यू अहिरे गावावर पुन्हा विस्थापनाची वेळ येणार आहे. त्यामुळे रिंगरोडला अहिरे ग्रामस्थांनी विरोध केला आहे. रस्तेविकास महामंडळाच्या रिंग रोडबाबतही तसाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे नगररचना विभागाकडून काय अभिप्राय दिला जातो आहे. त्यावर या दोन्ही रिंग रोडची अंतिम आखणी होणार आहे.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *