facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज?
take-off

शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज?

आवाज न्यूज लाईन

पुणे : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा सचिव पातळीवरील बैठकीत होणार आहे. या भूसंपादनापोटी कोची विमानतळ मॉडेलसह आणखी दोन-तीन पर्याय पुढे आले आहेत.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुरंदर तालुक्यातील जागेला पसंती दर्शविली आहे. या जागेचा तांत्रिक अहवाल तयार करण्याबरोबरच ग्राउंड लेव्हल सर्व्हेचे कामही लवकरच सुरू केले जाणार आहे. हा सर्व्हे करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ४५ लाख रुपये विमानतळ प्राधिकरणाला देण्याची तयारी दर्शविली आहे.

 पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात येत्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) मंत्रालयात सचिव पातळीवरील बैठक होणार आहे. या बैठकीला भारतीय विमानतळ प्राधिकरण, विमानतळ विकास कंपनी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यत्वे विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब आणि त्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. विमानतळाच्या उभारणीसाठी साधारणतः अठराशे ते दोन हजार हेक्टर (साडेचार ते पाच हजार एकर) जमीन संपादित करावी लागणार आहे. ही जमीन संपादित करण्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. कोची येथील विमानतळासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्यात आला होता. तसेच, त्यांना या प्रकल्पात भागधारक म्हणून सामावून घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर पुरंदरमधील शेतकऱ्यांना भपाईचे पॅकेज देता येईल का, याचा विचार सचिव पातळीवरील बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कोची विमानतळाच्या आर्थिक मॉडेलसारख्याच आणखी दोन-तीन मॉडेलवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुरंदरमध्ये विमानतळ करण्यास शेतकऱ्यांना विरोध नाही. शिवाय राजकीय पुढाऱ्यांनीही विमानतळाचे स्वागतच केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना भूसंपादनाची भरपाई देताना प्रकल्पात भागधारक करून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. पुरंदरमधील विमानतळाच्या प्रस्तावित जागेचा ग्राउंड लेव्हल सर्व्हे करण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही बैठकीत सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *