facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / VIDEO-‘ए दिल है मुश्किल’ची पडद्यामागची मज्जा

VIDEO-‘ए दिल है मुश्किल’ची पडद्यामागची मज्जा

मुंबई, दि.4- दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ 28 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाचा ट्रेलर, गाणी, आणि कलाकारांमुळे रिलीजपूर्वीच सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. यातच सिनेमाबाबत आणखी उत्सुकता ताणण्यासाठी ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमाचा शुटिंगदरम्यानचा व्हिडिओ रिलिज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर आणि सिनेमाच्या टीमचे
शुटिंगदरम्यानचे किस्से सांगण्यात आले आहेत. मात्र, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. करणच्या ‘ए दिल है मुश्किल’सिनेमातही पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने सिनेमा वादात अडकला आहे. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *