facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हण

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हण

आवाज न्यूज लाईन

सोलापूर – मराठवाड्यात आमच्या सरकारच्या काळात दोन दिवसाची बैठक चालायची मात्र या सरकारची दोन तासाची बैठक चालते आणि नागरिकांना दोन किलोमीटर पर्यंत जवळ देखील येऊ दिले जात नाही.मराठवाड्याची थट्टा या सरकारने लावली असून अरे कुठे न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हण यांनी सरकारवर टीका केलीय.

vlcsnap-2016-10-05-11h35m19s706आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर येथे जिल्हा आणि शहर काँग्रेस पक्षाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.यानांतर आयोजित पत्रकार परिषदेत अशोक चाव्हनांनी युती सरकारवर हल्ला चढवत कुठे नेव्हून ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी टीका केली.

झालेल्या पावसामुळे दुष्काळाचे संकट टळले मात्र शेतकर्यांसमोर अतिवृष्टीचे नवीन संकट निर्मण झाले आहे.मागील दुष्काळ आणि सध्याची अतिवृष्टी यामुळे शेतकरी पूर्णपणे खचलाय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. मराठा आरक्षण चिघळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.पठाण कोठ हल्ल्याबाबत भारतीय सैन दलाचे अभिनंदन करत असल्याचे सांगत सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या काळात देखील सर्जिकल स्ट्राईक झाली होती.असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *