facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / सोलापूर / पंढरपूर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

प्रतिनिधी – नागेश सुतार

पंढरपूर, दि.5: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृह पंढरपूर येथे पंढरपूर पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .

यावेळी प्रांतधिकारी विजय देशमुख, तहसिलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, निवडणुक नायब तहसिलदार सीमा सोनवणे, सहायक गट विकास अधिकारी डॉ.मंजूश्री गायकवाड आदी उपस्थित होते.

आगामी पंचायत समिती निवडणूकीसाठी तालुक्यातील पंचायत समितीच्या 16 गणाची आरक्षण सोडत  जाहिर करण्यात आली. त्यानुसार  करकंब, गुरसाळे, पिराची कुरोली, टाकळी, कासेगांव  या पाच पंचायत समिती गणांमध्ये सर्वसाधारण खुला गट जाहीर करण्यात आला आहे. भोसे, सुस्ते, वाखरी व सरकोली  या चार पंचायत समिती गणांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. भाळवणी व खर्डी पंचायत समिती गणामध्ये  नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला गट जाहिर करण्यात आला आहे. उंबरे  व पुळूज पंचायत समिती गणामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण जाहिर करण्यात आले. तर रोपळे व गोपाळपूर पंचायत समिती गणामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.तसेच पळशी पंचायत समिती गणामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.  या आरक्षण सोडती प्रसंगी तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना  सोमवार  दिनांक 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर  गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत हरकती व सूचना  जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे स्विकारल्या जाणार आहेत. याची संबधतांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रांतधिकारी विजय देशमुख यांनी केले आहे.

Check Also

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *