facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / सोलापूर / युवा महोत्सवाचा आज समारोप

युवा महोत्सवाचा आज समारोप

प्रतिनिधी – नागेश सुतार

 

पंढरपूर (स्वेरी महोत्सव नगरी)- फोकऑर्किष्ट्रा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, तालवाद्य, पथनाट्य, निर्मिती चित्र (इंस्टालेशन), फोटोग्राफी (छायाचित्र), रांगोळी या कलाप्रकारांनी आजचा दिवस गाजविला असला तरी प्रश्नमंजुषाने मात्र बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारत मुख्य रंगमंचावर प्रचंड टाळ्या मिळविल्या. यावेळी स्वागताध्यक्षांसह पाहुणे मंडळी प्रेक्षक बनले होते.प्रश्नमंजुषामध्ये स्वेरी, शिवाजी महाविद्यालय , बार्शी, सी,बी,खेडगी महाविद्यालय, बार्शी, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर,विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभूर्णी व के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर, हे सहा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यासाठी पत्रकार दीपक होमकर व सौ मेघा दीपक होमकर या पत्रकार दाम्पत्यांनी बुद्धीला चालना देणारे प्रश्न आणि तितक्याच वाक्यंचातुर्याने केलेला विनोद प्रेक्षकांना कमालीची उर्जा आणत होती.त्यामुळे भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी मुख्य रंगमंच्यावर वेळोवेळी हास्याचे फवारे उडत होते.

%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a5%a8 %e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a5%a9

 

 

 

 

 

 

 

स्वेरी मध्ये युवा महोत्सवाचा आज तिसरा दिवस अत्यंत उत्साहात गेला.महोत्सवाचा प्रत्येक पुढचा दिवस अजून बहरत जात होता हेच सादरीकरणावरून जाणवत आहे. तिन्ही दिवस बाहेरून आलेले विद्यार्थी, महोत्सवातील सदस्य व स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातील मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी अडकवलेले दुहेरी ओळखत्रांमुळे नवमतदारापर्यंत ‘मतदार नोंदणी करावी’ हा संदेश सर्वदूर पोहचत होता. याचीच कॅम्पसमध्ये सर्वत्र चर्चा होती. विद्यापीठ अंतर्गत तेवढीच महाविद्यालये असली तरी अनेकांनी कलाप्रकारातील सहभाग वाढविला होता. निर्मिती चित्र (इंस्टालेशन) कलाप्रकारात यंत्रमानव, शेती तंत्रज्ञान , राष्ट्रीय एकात्मता व रक्तदान हे चार विषय ऐनवेळी दिले होते. यामध्ये  तब्बल ३१ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता तर प्रत्येकी एका प्रकल्पांमध्ये चार विध्यार्थी होते. यात वालचंद कॉलेजने टाकावू पासुन टिकाऊ पदार्थ वापरून मोर बनविले होते.सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैरागच्या विद्यार्थ्यांनी व स्वेरी विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती, के.बी.पी.महाविद्यालय पंढरपूर मधील विद्यार्थ्यांनी रक्तदान श्रेष्ठ दान असल्याचा संदेश दर्शविणारे प्रकल्प सादर केले होते. महाविद्यालयासमोर कॅम्पसमध्ये पथनाट्यसादर करताना ज्वलंत प्रश्न अभिनयातून मांडताना शिवाजी महविद्यालयाने सादर केलेला स्त्री सुरक्षा विषयावर ‘लाखो रावण मिळतील पण एक राम मिळत नाही’ असे सांगत केलेला अभिनय अप्रतिम वाटला तर दामाजी महाविद्यालयाने रूग्णालयातील भ्रष्टाचार व बेरोजगारांच्या गंभीर समस्या मांडल्या तर स्वेरीने आरक्षण विषयी ज्वलंत प्रश्न मांडून वाहवा मिळविली.यात देखील स्वेरीच्या चिन्मय पाठकने बाजी मारली. फोक ऑर्किष्ट्रामध्ये पारंपारिक भारतीय लोककलेचे वाद्याच्या गजर होत होता. यालादेखील प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली.जेवणात कोलकत्ता जामुनवर ताव मारत विद्यार्थी भारतीय बैठक मारून पुढच्या कार्यक्रमाच्या चर्चेतच भोजन घेत होते. ऑनलाईन विठ्ठल रुक्मिणी दर्शनांचे आज बातमी पाठवेपर्यंत तब्बल नऊशे जणांनी दर्शन घेतले. यासाठी दिवसभर कॉलेज बस व क्रुझरमधून दर्शनासाठी ने-आण करण्यासाठी सज्ज होटी. युवा महोत्सवाच्या वेळी कोणत्याही कलावंतांना काहीही इजा होऊ नये यासाठी स्वेरीच्या वतीने २४ तास प्राथमिक उपचाराची अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून सुविधाभिमूक महोत्सव कसा करता येईल याकडे बारकाईने लक्ष्य दिले आहे.यामध्ये स्पर्धकांच्या आरोग्यसेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या इमर्जेन्सी मेडिकल सर्विसेस (१०८) विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.अनिल काळे व सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पसमध्ये  २४तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली असून यात व्हेंटीलेटर, वैद्यकिय अधिकारी, प्रथमोपचारासाठी आवश्यक औषधे, कर्मचारी व अत्याधुनिक वैद्यकिय सेवा सज्ज आहे. सोबत स्वेरीच्या निवासी  वैद्यकिय अधिकारी  डॉ. आर.एम.मणियार यांचीही सेवा स्पर्धक व विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिली आहे.या सेवेसाठी फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.एम.जी.मणियार, प्रा.दि.जे.यादव, प्रा. प्रा. रवींद्र बेन्द्गुडे,प्रा.व्ही.डी.चिपडे व सहकारी हे परिश्रम घेत आहेत तर वय फाय इंटरनेट ची सोय पाहिल्यादिवासा पासून  करण्यात आली असून आज तिसर्या दिवस पाच वाजेपर्यंत मोबाईल मधून १८०० व फॉर्मद्वारे २५० असे मिळून तब्बल २०५० विध्यार्थी स्पर्धकांनी वाय फायसाठी रजिष्ट्रेशन करून याचा लाभ घेतला आहे. अशी माहिती हायटेक इंटरनेट प्रमुख प्रा. अंतोष द्याडे व प्रा. परमेश्वर माळी यांनी सांगितले. आज या युवा महोत्सवाचा समारोप असून शोभायात्रा विशेष आकर्षक असणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गंगूबाई नॉनमॅट्रिक फेम पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलुगुरू डॉ. एन.एन.मालदार उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. बी.पी.रोंगे यांनी सांगितले.दुसर्या दिवशी मुख्य रंगमंचावर प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे सर्वांना कार्यक्रमाचा आनंद  घेता यावा यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा एल.सी.डी.लावला होता तर स्वेरीच्या मैदानावर शिवाजी महाविद्यालयाने एक दिवस अगोदरच ढोल तशा वाजवत विजयी जल्लोश सुरु केला. सर्वात विशेष म्हणजे शिस्ठीच्या सहवासात विध्यार्थी देखील शिस्तप्रिय झाले होते. प्रत्त्येक कलावंतांना भरभरून प्रतिसाद मिळत होते. असे दृश्य दिसणारे जिल्ह्यातील हे पहिलेच महाविद्यालय आहे असे वसुंधरा महाविद्यालयाचे  कलावंत सांगत होते. तिन्ही दिवस महोत्सवातील सदस्य सर्व पाहुण्यांची काळजी घेत होते. सर्व सोय झाल्यामुळे कलावंत प्रफुल्लीत झाल्याचे दिसत होते.

Check Also

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *