facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / ५० हजार लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन नष्ट ,१० जणांवर गुन्हे दाखल

५० हजार लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन नष्ट ,१० जणांवर गुन्हे दाखल

%e0%a5%a6 %e0%a5%98%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87

 

 

 

 

प्रतिनिधी – नागेश सुतार

सोलापूर –  राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सोलापूर तालुका पोलीस ठाणे व अन्य विभागाच्या मदतीने बुधवार ५ आॅक्टोबर रोजी मुळेगांव, बक्षीहिप्परगा (ता़ द़.सोलापूर) येथील अवैध धंद्यावर धाड टाकून २४९ बॅरेलमधील ५० हजार लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन नष्ट करून १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़.

बुधवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मुळेगांव तसेच बक्षीहिप्परगा तांड्यावर अचानक धाड टाकून दारू अड्डे उध्वस्त केले़ यात गुळ मिश्रित रसायन, प्लास्टिक टाक्या, बॅरेल असे साहित्यही नष्ट केले़ या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन जेसीपी यंत्रांच्या सहाय्याने हातभट्टी तयार करणारा गूळ, रसायन आणि इतर साहित्य ठेवलेले पिंप नष्ट केले. काही ठिकाणी जमिनीत व पिकांमध्ये तसेच विहिरीत दारूचा साठा दडवून ठेवण्यात आला होता याचाही शोध पोलीसांनी घेतला़ हातभट्टी दारू तयार करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत तारांवर चक्क आकडे टाकून तर काही ठिकाणी बेकायदेशीर विद्युत जोडणी करून विजेचा वापर केला जात होता. महावितरणच्या पथकाने ही वीज जोडणी तोडून टाकल्याची माहिती समोर आली आहे़ शिवाय या हातभट्टी दारू निर्मिती कारखाने चालविणारे व त्यासाठी स्वत:च्या जागा उपलब्ध करून देणाºयांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत़ मुळेगांव व बक्षीहिप्परगा तांड्यावर यापूवीर्ही कारवाई करण्यात आली होती.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *