facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकिस्तानला, आम्हाला शांतता हवी- नवाझ शरीफ
nawaz-sharif

दहशतवादाची सर्वाधिक झळ पाकिस्तानला, आम्हाला शांतता हवी- नवाझ शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेत काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. पंतप्रधान शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत उपस्थित केलेले मुद्द्यांचाच पुन्हा पाकिस्तानी संसदेत उल्लेख केला. बुरहान वानी हा काश्मीरचा हिरो असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. ते म्हणाले, पाकिस्तानने खुल्या मनाने उरी हल्ल्याचा तपास करण्याची ग्वाही दिली. परंतु कोणत्याही पुराव्यांशिवाय सीमेपलीकडून आम्हाला धमक्या देण्याचे सत्र सुरू झाले. भारताने अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेपार गोळीबार केला. पाकिस्ताननेही त्यांना त्या वेळी योग्य प्रत्युत्तर दिले असे सांगत उरी हल्ल्याप्रकरणी आपली जबाबदारी नाकारली.
आम्ही कधीच युद्धाचा पर्याय स्वीकारलेला नाही. जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्याशी स्पर्धा करू. आम्ही रोजगार निर्मितीतही त्यांच्याशी स्पर्धा करू. पण ज्यांच्या शेतात स्फोटके पेरलेली असतात. तिथे चैतन्याचे वातावरण कधीच नसते असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये झालेल्या भाजपच्या परिषदेत पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देण्यापेक्षा भारताशी शैक्षणिक क्षेत्रात व रोजगार निर्मितीत स्पर्धा करण्याचे आवाहन केले होते. नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत मोदींना उत्तर दिले.
पाकिस्तान स्वत: दहशतवादाशी लढत आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेला आमचा लढा सर्व जगाला ठाऊक आहे. एक जबाबदार देशाची जबाबदारी काय असते हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *