facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / पुण्यात डंपरने दुचाकीला उडवले भावंडांसह ३ ठार
13516340_115290022235705_871404053873110509_n

पुण्यात डंपरने दुचाकीला उडवले भावंडांसह ३ ठार

आवाज न्यूज लाईन

पुणे : मोशीहून भोसरीच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला डंपरने उडवले. या अपघातात दुचाकीवरील भावडांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळ झाला. राजपाल तायडे, मच्छिंद्र काशिनाथ ठुबल, विशाल सावळा ठुबल (सर्व राहणार, भारतमाता नगर, मोशी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे जण दुचाकीवरुन मोशीकडून भोसरीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला उडवले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी दुचाकीस्वार मुलांजवळ जेवणाचे पार्सल आणि बिअरच्या बाटल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *