facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / पिंपरीत वाहतूक जनजागृती दिवस साजरा .

पिंपरीत वाहतूक जनजागृती दिवस साजरा .

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी : गुरुवारी शहरात वाहतूक जनजागृती दिवस साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच वाहतूक विभागातर्फे  महिन्याभरापासून या दिवसाची तयारी सुरु होती. उद्योगनगरीत वाहतूक जनजागृती दिनासाठी विशेष उत्साह दिसून आला. शहरातील २५ पेक्षा जास्त प्रमुख शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सर्व शाळांमधील सुमारे ७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले. सकाळी साडे नऊ वाजता पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यापासून उपक्रमाला सुरवात झाली. पोलिसांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम जनजागृतीचा प्रारंभ केला. नागरिक आणि वाहन चालकांना वाहतूक नियम लिहलेले स्टिकर्स आणि झेंड्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील चौकाचौकात घोषणा, फलक आणि पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या योग्य व्यवस्थपणामुळे वाहतुकीला कोणत्याही स्वरूपाचा अडथळा आला नाही किंवा वाहतूक वळवावी लागली नाही.

यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी तयार केली. सुमारे पाच किलोमीटर पर्यंत पसरलेली ही साखळी वाहन चालकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. पिंपरी बरोबरच भोसरी, चिंचवड आणि निगडी वाहतूक शाखेचाही यामध्ये सहभाग होता. बरोबर अकरा वाजता दोन मिनिटांसाठी शहरातील वाहतूक थांबवत वाहतूक नियम पाळण्याची शपत घेण्यात आली

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *