facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / रेल्वे प्रशासनाकडून विजयादशमी व दिवाळीच्या निमित्ताने पुण्याहून ‘हॉलिडे स्पेशल’गाड्या

रेल्वे प्रशासनाकडून विजयादशमी व दिवाळीच्या निमित्ताने पुण्याहून ‘हॉलिडे स्पेशल’गाड्या

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे : विजयादशमी व दिवाळीच्या निमित्ताने पुण्याहून देशाच्या अन्य भागांत जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ‘हॉलिडे स्पेशल’ साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. जयपूर, जम्मूतावी आणि वाराणसी येथे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.
पुणे-जम्मूतावी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीच्या २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत पुणे व जम्मूतावी येथून प्रत्येकी पाच फेऱ्या होणार आहेत. पुणे स्टेशनवरून ही गाडी दर रविवारी सकाळी ११.१५ मि. वाजता सुटेल. ती सोमवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी जम्मूतावीला पोहोचेल. तर, जम्मूतावी येथून मंगळवारी सकाळी ०९.३० वाजता सुटणारी गाडी, पुण्यात बुधवारी रात्री ०९.१५ वाजता पोहोचेल.
पुणे-वाराणसी गाडी २७ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या गाडीच्या देखील प्रत्येकी पाच फेऱ्या होतील. ही गाडी पुणे स्टेशनवरून गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता सुटून शुक्रवारी सायंकाळी ०५. वाजता वाराणसीला पोहोचेल. तर, वाराणसी येथून शुक्रवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी गाडी पुण्यासाठी रवाना होईल. ती रविवारी पहाटे ०४.०५ मिनिटांनी पुणे स्टेशनवर दाखल होईल.
पुणे-जयपूर ही गाडी २३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकी सहा फेऱ्या करणार आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्यावरून सुटणारी गाडी सोमवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी जयपूरला पोहोचणार आहे. जयपूरवरून सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी गाडी सुटेल. ती मंगळवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *