facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / आठ दिवसात आयटीच्या प्रस्तावाला मंजुरी
pmc

आठ दिवसात आयटीच्या प्रस्तावाला मंजुरी

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे : आयटी आणि परवडणाऱ्या घरांसाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग (आयटी) आणि परवडणाऱ्या घरांसाठीच्या बांधकाम प्रस्तावांसाठी पुणे महापालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून, आठ दिवसांत संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत जाहीर केलेल्या धोरणानुसार महापालिकेने त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे आयटी शेत्रातील लोकांना याचा लाभ होणार आहे.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी आयटीसाठी स्वतंत्र धोरण जाहीर केले आहे. तसेच, आयटी उद्योगांसाठी जलदगतीने परवानगी देण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान निवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या बांधकाम प्रकल्पांनाही लवकर परवानगी देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली आयटी आणि परवडणाऱ्या घरांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते. वाघमारे यांनी बुधवारी त्या संदर्भातील आदेश काढून तीन अधिकाऱ्यांकडे या कक्षाची जबाबदारी दिली आहे. कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर, उपअभियंता रामकृष्ण वारे आणि शाखा अभियंता चंद्रसेन नागटिळक या कक्षाचे काम पाहतील. आयटी आणि परवडणाऱ्या घरांसाठीचे प्रस्ताव महापालिकेत दाखल झाल्यापासून आठ दिवसांत त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी या कक्षावर असेल अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
या स्वतंत्र कक्षामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रस्तावांच्या मंजुरीवर थेट शहर अभियंता यांची देखरेख राहणार आहे. दर शुक्रवारी त्या संदर्भातील अहवाल शहर अभियंत्यांना सादर करण्याचे बंधन घालण्यात आले असून, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *