facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / नवरात्र उत्सवा निमित्त रुक्मिणी तुळजाभवानी च्या रूपात
rukhmini

नवरात्र उत्सवा निमित्त रुक्मिणी तुळजाभवानी च्या रूपात

आवाज न्यूज नेटवर्क – प्रतिनिधी : नागेश सुतार

पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त  तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या  रूपात रुक्मिणी मातेस सजवण्यात आले होते, आणि पारंपरिक पोशाखात सावळ्या  विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. नवरात्री निमित्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे .

आज चौथ्या दिवशी रुक्मिणी मातेची तुळजाभवानी च्या रूपात पूजा करण्यात आली. देवीच्या अंगावर १२ प्रकारचे आकर्षक दागिन्यानी सजवले. यामध्ये बाजू बंद, सरी ,पैंजण , तारमंडळ ,पुतळ्याची माळ ,चंद्र हार ,नवरत्नांचा हार , पाचू हार ,मासोळी , कारण फुले , टोप अश्या प्रकारच्या  सर्व साजाने देवीचे रूप मनमोहक दिसत होते. नवरात्रीच्या काळात देवाचे हे वेगळे आणि आकर्षक देखणे रूप पाहण्यासाठी  पंढरपूर आणि परजिल्ह्यातून अनेक महिला भाविक आवर्जून गर्दी करतात.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *