facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / लाच घेतल्याप्रकरणी जळगाव पालिका उपायुक्तांना अटक
rajendra-phatle

लाच घेतल्याप्रकरणी जळगाव पालिका उपायुक्तांना अटक

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर  यांच्या घराची झडती पथकाने घेतली. तसेच फातले यांच्या  कोल्हापूर येथील घराचीही झडती घेण्यात आली . हे प्रकरण उघड झाल्याने त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

फातले यांच्या निवासस्थानी कारवाई केल्यावर लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी पराग सोनवणे व पथकाने महापालिकेत १३ व्या मजल्यावर जाऊन उपायुक्त कार्यालयातून अभियंता निलंबनाच्या फाइल ताब्यात घेतल्या आहेत. उपायुक्त फातले यांना लाच घेताना पकडले आहे. याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आल्यावर तो शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. या नंतरची कारवाई शासनाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *