facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / हैदराबादला मराठा मोर्चा-हजारो उतरले रस्त्यावर
maratha

हैदराबादला मराठा मोर्चा-हजारो उतरले रस्त्यावर

आवाज न्यूज नेटवर्क

हैदराबाद : कोपर्डी येथीलअल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात हैदराबाद येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी संध्याकाळी मेणबत्ती पेटवून शांततेच्या मागार्ने निषेध नोंदविला.
यावेळी विविध राज्यांतून आलेले हजारो युवक या मोर्चात सहभागी झाले.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यात काढण्यात येत असलेल्या मोर्चाची ठिणगी आता हैदराबादपर्यंत जाऊन पोचली आहे. गेल्या महिनाभरापासून मराठा मोर्चाचे सत्र सुरू असून लाखोंच्या संख्येत मराठा समाज त्यात सहभागी होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय सूत्रेदेखील झपाट्याने हालू लागली आहेत. याच मोर्चांची प्रेरणा घेत कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी या प्रमुख मागणीसाठी हा हैदराबादमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यात हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रासोबत देशभरातील विविध राज्यांतून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या विरोधात हैदराबाद शहरातील तरुण आणि स्वामी विवेकानंद युथ असोसिएशन या सामाजिक संघटनांच्या वतीने या मोचाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये हैदराबाद शहरातील संघटनेचे युवा अध्यक्ष वेलाला राममोहन व हरी बाबू उपस्थित होते. तर मोर्च्याच्या आयोजनात सागर मालपुरे, सुशांत पवार, कल्पेश कोतकर, अभिजीत बागल, नितिन पुजारी, विनोद देवरे, मनोज पाटील या राज्यातील विद्यार्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
देशातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून सतत बलात्कारासारख्या घटना होत आहेत. त्यामुळे देशात महिला, मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात १३ जुलै रोजी अहमदनगरमधील कोपर्डी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे दिल्ली येथे घडलेल्या निर्भया हत्याकांडाची पुर्नरावृत्ती झाली. मात्र त्यातील आरोपींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. या नराधमांना कठोर फाशीची शिक्षा व्हायला हवी. त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि पुन्हा असा प्रसंग देशभरात कुठेही घडू म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *