facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रेस

राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रेस

आवाज न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी – नागेश सुतार
पंढरपूर : सीमावर्ती भागातील कर्नाटकमधील साखर कारखाने महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ डिसेंबर ऐवजी नोव्हेंबर मध्ये सुरु करावा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय  यामुळे गाळप हंगाम सुरु होण्यावरून सुरु असणारा संभ्रम दूर होण्याची शकयता आहे .
यावर्षी गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्याने सीमावर्ती भागातील साखर कारखाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचा ऊस पळवून नेण्यासाठी यंत्रणा राबवत आहेत . हीच भीती खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे , त्यामुळे अनेक साखर कारखानदारांनी १ डिसेंबर ऐवजी साखर गाळप हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरु करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यकडून उसवरून होणारी साठमारी लक्षात घेता गाळप लवकर सुरु होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राज्यमंत्री खोत म्हणले.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी ची  एफआरपी प्रमाणे पहिली उचल दिली नाही. त्यामुळे अनेक ऊसउत्पादक अडचणीत आले आहेत . बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्यावर जशी जप्तीची कारवाई झाली अशीच कारवाई सोलापूर जिल्ह्यातील पहिली उचल न देणाऱ्या साखर कारखान्यावर आपण करणार आहे . सरकार  कोणत्याही साखर सम्राटांना पाठीशी घालणार नाही असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे .

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *