facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / सरकार विरोधी घोषणा देत सदाभाऊ खोत यांचा हि निषेध
vlcsnap-2016-10-07-11h37m53s313

सरकार विरोधी घोषणा देत सदाभाऊ खोत यांचा हि निषेध

 

प्रतिनिधी – नागेश सुतार

राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत पंढरपूर दौऱ्यावर आले असता काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारात त्यांच्या समोरच सरकार विरोधी घोषणा देत सदाभाऊ खोत यांचा हि निषेध केला . मध्यरात्री पंढरपूर येथे हा प्रकार घडला,  ना . खोत हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत .

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून सळो  कि पळो करून सोडणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे सत्तेत गेल्यानंतर आपली तलवार म्यान केली आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले असा आरोप करीत काँग्रेस , राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सदाभाऊंवर प्रश्नांनाची सरबत्ती करीत सरकार आणि सदाभाऊ खोत यांचा निषेध केला . ऊसाला भाव , शेतीमालाला हमी भाव , कर्ज माफी याविषयावर चर्चा करण्यासाठी हे पदाधिकारी गेले असता मंत्र्यांपेक्षा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षाचं बोलू लागले आणि त्यांनी थेट तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करा असा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि सदाभाऊंचाच निषेध केला आणि भविष्यात रस्त्यावर उतरूनच आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला .

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *