facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / पालकांच्या बळजबरीने घेतला , 13 वर्षीय तरुणीचा मृत्यू

पालकांच्या बळजबरीने घेतला , 13 वर्षीय तरुणीचा मृत्यू

हैदराबाद : परंपरांचा भाग म्हणून आराधना नावाच्या तरुणीला तिच्या आई-वडिलांनी दोन महिने म्हणजे साधारण 64 दिवसांचा उपवास करण्यास भाग पाडलं होतं. मात्र ते सहन झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
आराधनाच्या कुटुंबीयांचा सिकंदराबादमधील पोटबाजार परिसरात दागिन्यांचा व्यवसाय आहे.

13 वर्षीय मुलीला 64 दिवसांचा उपवास धरण्याची केलेली बळजबरी पालकांना चांगलीच महागात पडली आहे. उपवास न झेपल्यामुळे हैदराबादमध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे.

आराधना सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये आठव्या इयत्तेत शिकत होती. 1 ऑक्टोबरला तिचा 64 दिवसांचा उपवास संपला. उपवास संपल्यानंतर दोन दिवस ती फक्त द्रवपदार्थांचं सेवन करत होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचं ब्लड प्रेशर खालावलं. तिला खाजगी रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं.

बालल हक्कुला संघम या स्थानिक एनजीओने हैदराबाद पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. आराधनाचे पालक आणि त्यांच्या समाजातील ज्येष्ठांनी तिला चातुर्मासाच्या नावाखाली उपवास धरण्याची सक्ती केल्याचा आरोप या पत्रात केला आहे.

आराधनाच्या अंत्ययात्रेला सहाशेहून जास्त जण उपस्थित होते. यावेळी तिचा ‘बाल तपस्वी’ असा उल्लेख करत तिची शोभायात्रा काढण्यात आली. आराधनाच्या कुटुंबीयांवर भेटवस्तूंचा वर्षाव करत तिच्या मृत्यूचा सोहळा साजरा केल्याचंही म्हटलं जातं.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *