facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / काटजूंचे मनसेला आव्हान हिंमत असेल तर या माझ्याकडे दंडुका तयारच आहे !
hy07katju_1419618f

काटजूंचे मनसेला आव्हान हिंमत असेल तर या माझ्याकडे दंडुका तयारच आहे !

पाकिस्तानी कलाकारांना काम देणाऱ्या भारतीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनसेने मारण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर काटजू यांनी मनसेला आव्हान दिले आहे. या वेळी त्यांनी आपला रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर वळवला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे. मी दंडुका घेऊन तयारच आहे असे आव्हान त्यांनी दिले आहे.
असहाय्य लोकांवर दादागिरी करून तुम्ही कुठले शौर्य दाखवत आहात? तुमच्यात जर दम असेल तर माझ्याकडे या. मी दंडुका घेऊन तयार आहे असे ट्विट करून त्यांनी मनसेला आव्हानच दिले आहे.
काटजू यांच्या या टविट्नंतर अद्याप मनसेची प्रतिक्रिया आलेली नाही. या वक्तव्यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यात मनसेने मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना रस्ते खराब असल्याकारणाने अपमानास्पद वागणूक दिली होती. या अभियंत्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. सध्या मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यासह आणखी एक नगरसेवक न्यायालयीन कोठडीत आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *