facebook
Thursday , February 23 2017
Breaking News
Home / Featured / ICC रँकिंगमध्ये अश्विन आणि राहणेची झेप

ICC रँकिंगमध्ये अश्विन आणि राहणेची झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या – तिसऱ्या कसोटीआधी अश्विन आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. पण, इंदूरमध्ये त्याच्या फिरकीनं कमालच केली. पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेऊन त्यानं किवींची दाणादाण उडवून दिली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच, विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतानं विजयाचं सोनं लुटलं. इंदूर कसोटीत १३ आणि मालिकेत २७ विकेट घेणारा अश्विन ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरला.

आयसीसी रँकिंगमध्ये डेल स्टेन आणि जेम्स अँडरसनला मागे टाकत त्यानं ‘एक नंबरी’ झेप घेतली आहे. अश्विनच्या खात्यात तब्बल ९०० गुण जमा आहेत. हा पल्ला याआधी मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, वर्नेन फिलँडर, डेल स्टेन, शॉन पॉलॉक या दिग्गजांनी गाठला होता. आता अश्विनही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

icc-cricket-rankings-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अंजिक्य रहाणे क्रमवारीत सहाव्या स्थानी

अजिंक्य रहाणे इंदूरमधील दीडशतकी खेळीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर दाखल झालाय. हे त्याचं आत्तापर्यंतच सर्वोत्तम रँकिंग आहे. द्विशतकवीर विराट कोहलीही चार पायऱ्या चढून १६व्या क्रमांकावर पोहोचलाय, तर इंदूरमधील शतकवीर चेतेश्वर पुजारा १४व्या स्थानी आहे. ‘ऑल राउंडर’ क्रिकेटपटूंच्या यादीत रवींद्र जाडेजा तिसऱ्या स्थानावर आहे.

icc-cricket-rankings-

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *