facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून तब्बल १३ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावावर २७ विकेट्स जमा झाल्या. अश्विनच्या याच उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावर सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

गेल्या काही दिवसांत सेहवागने केलेल्या ट्विटला भरभरून पसंती मिळाली होती. सेहवागच्या हजरजबाबी ट्विट्सने अनेक ट्विटरकरांनी कौतुक देखील केले होते. आता पुन्हा एकदा सेहवागने फिरकीपटू आर. अश्विनवर केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

सातव्यांना मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनला शुभेच्छा, फक्त विवाहित पुरूषालाच घरी लवकर जाण्याचे महत्त्व समजू शकते, असे मजेशीर ट्विर सेहवागने केले. सेहवागच्या या ट्विटवर अश्विनच्या पत्नीला हसू अनावर झाले. अश्विनच्या पत्नीने सेहवागला त्वरित रिप्लाय देखील दिला. इतकेच नव्हे, तर सेहवागच्या पत्नीनेही ट्विट केले. सेहवागच्या मजेशीर ट्विटची दखल अश्विननेही घेतली. सेहवागच्या विनोदबुद्धीचे अश्विनने कौतुक केले.

 

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *