facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / पम्पोरमध्ये भारतीय सेनेची कामगिरी ; 2 दहशतवादी ठार

पम्पोरमध्ये भारतीय सेनेची कामगिरी ; 2 दहशतवादी ठार

आवाज न्यूज नेटवर्क

12 ऑक्टोबर : सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन ते तीन दहशतवादी ईडीआय इमारतीत घुसले होते. तेव्हापासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. मंगळवारी रात्री आणि आज पहाटे असे दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलं आहे. लष्कराने परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.

काश्‍मीरमधील पम्पोर भागातील एका सरकारी इमारतीमध्ये लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान सुरू असलेली चकमक आज (बुधवारी) तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. सुरक्षा रक्षकांना 2  दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलं आहे.

दरम्यान, मंगळवारी शोपियाँ येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक जवानासह सात जण जखमी झाले होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *