facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / पुण्यात खासगी उड्डाणांवर निर्बंध

पुण्यात खासगी उड्डाणांवर निर्बंध

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे : संभाव्य धोका टाळण्यासाठी पुण्याच्या हवाई हद्दीतील खासगी उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले असून, लोहगाव विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाच्या (एटीसी) परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे विमान, हेलिकॉप्टर, ग्लायडर, पॅराग्लायडर आदींचे उड्डाण करता येणार नाही. परवानगीशिवाय उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजून त्याला तातडीने गंभीर उत्तर दिले जाईल, असा इशारा हवाई दलातर्फे देण्यात आला आहे.

लोहगावचा तळ हा हवाई दलाच्या प्रमुख तळांपैकी एक आहे. तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणेही होत असतात. त्यामुळे येथे हवाई दलाच्या अत्याधुनिक विमानांसोबतच नागरी वाहतूक कंपन्यांची विमानेही उभी असतात. उरी येथील दहशतवादी हल्ला आणि त्यापाठोपाठ पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरातील लष्करी संस्थांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहगाव हवाई तळाबाबत आदेश देण्यात आला आहे. उड्डाणासाठी ठरवून दिलेला मार्ग व अन्य निकषांचेही काटेकोर पालन करण्याचा  इशाराही देण्यात आला आहे.

‘यापुढे परवानगीशिवाय कोणतेही उड्डाण केल्यास किंवा ठरवून दिलेल्या मार्गाशिवाय हवाई तळाच्या जवळपास उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजण्यात येईल. त्याचबरोबर तातडीने गंभीर पावलेही उचलण्यात येतील,’ असे या आदेशात म्हटले आहे. शिर्डी विमानतळ,  हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर यांसह या परिसरात अनेक बड्या उद्योजकांची खासगी  हेलिपॅड आहेत. त्यावरून नियमित उड्डाणे सुरू असतात. या सर्व हेलिपॅड किंवा विमानतळांच्या, तसेच फ्लाइंग क्लबच्या व्यवस्थापकांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *