facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / भुजबळांना जे. जे. तुन थेट तुरुंगात

भुजबळांना जे. जे. तुन थेट तुरुंगात

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून भुजबळांच्या तब्येतीमध्ये चढउतार होत आहेत. त्यासाठी काही विशेष तपासण्या करण्याची गरज आहे. त्या तपासण्यांची सोय जे.जे. रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा तपासण्यांची सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं जाणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली.

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयातून एखाद्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये हलवलं जाणार असल्याची माहिती होती. रुग्णालयाकडून तशा प्रकारचं पत्र जेल प्रशासनाला पाठवण्यात आलं होतं.

छगन भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. भुजबळांची रवानगी पुन्हा आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही .

त्यासाठी लहाने यांनी जेल प्रशासनाला पत्रही लिहिलं. पण असे कोणतेही पत्र मिळालं नसल्याचा दावा जेल प्रशासनाने केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर जेजेमध्ये उपचार सुरु आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *