facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / माहिरा खानची ‘रईस’ मधून हकालपट्टी

माहिरा खानची ‘रईस’ मधून हकालपट्टी

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणाव पाहता गेले काही दिवस या चित्रपट निर्मात्यांना माहिराला चित्रपटातून काढून टाकण्याविषयी वारंवार विचारले जात होते. पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता चित्रपटांच्या चित्रीकरणामध्येही अनेक अडथळे येत होते. त्यावर उपाय म्हणून अनेकांनी निर्मात्यांना भारताबाहेर चित्रीकरण करण्याचे सल्लेही दिले होते. पण, हे काही कारणास्तव शक्य नसल्यामुळे माहिराची ‘रईस’मधून गच्छंती करण्यात आली आहे.

मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याचा दिलेला इशारा आणि त्यांनतर ‘इम्पा’नेही त्यांच्या ७७ व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटातूनही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची गच्छंती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माहिरा या चित्रपटातून झळकणार की नाही याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तुर्तास सूत्रांच्या माहितीनुसार माहिराची ‘रईस’ या चित्रपटातून गच्छंती झाल्याच्या चर्चांना बॉलिवूड विश्वामध्ये उधाण आले आहे. दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहता पाकिस्तानी कलाकारांच्या दृश्यांवर कात्री मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेता फवाद खान याने ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात विराट कोहलीची भूमिका साकारली होती. पण त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेली दृश्ये या चित्रपटातून वगळण्यात आली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *