facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / २५० किलो चिकन खाल्ले गेले दसरा दिवशी

२५० किलो चिकन खाल्ले गेले दसरा दिवशी

आवाज न्यूज नेटवर्क

मंगळवारी सायंकाळपासूनच चिकन, मटणाच्या दुकानात आणि हॉटेलात ग्राहकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. चिकनच्या तुलनेत मटणाला मागणी कमी असल्याचे दिसून आले.नऊ दिवस देवीच्या पूजनामुळे मांसाहार केला जात नाही. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते.पितृ पंधरवड्यापाठोपाठ नवरात्रोत्सव 25सुरू झाल्याने मांसाहारावर बंधन आले होते. मात्र, ही उणीव भरून काढत पुणेकरांनी दसऱ्याच्या दिवशी अडीचशे टन चिकन आणि सातशे किलो मटण फस्त केले.
या पार्श्वभूमीवर, पुणेकरांनी मंगळवारी दुपारपासून खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी केली होती. अचानकपणे मंगळवारी ग्राहकांची मागणी वाढल्याने दुकानदारांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

‘मांसाहार करताना चिकनला पसंती दाखविणाऱ्या खवय्ये मटणाची मोठी मागणी नोंदवितात. परंतु, अनेक वर्षांपासून मटणाचे वाढणारे दर, बोकडाच्या उपलब्धतेचे प्रमाण पाहता चिकनला अधिक मागणी निर्माण होत आहे. तरीही काही प्रमाणात मटणला मागणी होती.‘दसऱ्याच्या दिवशी अचानकपणे चिकन, मटणाची मागणी वाढली. मंगळवारी दुपारनंतर हॉटेल, चायनीज विक्रेत्यांसह घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविली गेली. मटणाला मागणी कमी असल्याने दिवसभरात २०० ते २५० टन चिकनची शहरात विक्री झाली. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी शहरात १०० ते १५० टन चिकनविक्री झाली होती. यंदा अचानक मागणी वाढल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला,’ अशी माहिती चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली. एक किलो चिकनसाठी ग्राहकांना १४० रुपये मोजावे लागले. तर, लेगपीस, जिवंत कोंबडी आणि बोनलेस चिकनला अनुक्रमे १७०, ११० आणि २४० रुपये भाव मिळाला.

चाकण आणि अकलूज येथून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मटणाला यंदा मागणी कमीच होती. त्यामुळे सातशे किलो मटणाची विक्री झाली,’ अशी माहिती मटण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली. बोकडासह बोल्हाईच्या मटणाला एका किलोसाठी ४४० रुपये दर मिळाला. खिम्याला ४४० रुपये तर, कलेजीसाठी ४६० रुपये मोजावे लागले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *