facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / आगीत जळून कारखाना खाक
2016-10-12fire22_ns

आगीत जळून कारखाना खाक

आवाज न्यूज नेटवर्क

कुरकुंभ : .जवळपास तीन तासा पेक्षा जास्त काळ चाललेल्या या आगीमुळे कुरकुंभ,पांढरेवाडी व परिसरातील रासायनिक कंपनीतील सारेचजण धास्तावले होते. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील पटनी फोम्स प्रा. लि . या लघु उद्योग कंपनीस मंगळवार (दि.११) सध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत रात्री आठ वाजेपर्यंत पुर्ण कंपनी जळुन राख झाली.

या औद्योगिक क्षेत्रामधील लघु उद्योग स्वरुपाची ही कंपनी असुन या ठिकाणी गाद्यांमध्ये वापरण्यात येणारा फोम उत्पादित केला जातो.या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच अन्य कंपनीच्या माध्यमातुन आलेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या साठी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र, कारगील, ओनर लँब, सिप्ला, एम क्युअर, दौंड नगर परिषदेच्या सह अन्य अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र पाण्याची कमतरता सातत्याने भासली.

 

या घटनेचे प्रसंगावधान राखुन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रणात्मक कार्यवाही केली. रात्रीनंतर ही आग अखेरीस आटोक्यात आली.

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *