facebook
Monday , December 5 2016
Home / Crime / मोनिका घुरडेचा खून- पॉर्न क्लिप दाखवून बलात्कार केला
dc-cover-6prf7tusfdp7g5sbbfn4qoh3b0-20161010014255-medi

मोनिका घुरडेचा खून- पॉर्न क्लिप दाखवून बलात्कार केला

मोनिका घुरडे यांचा मृतदेह शनिवारी दुपारी गोव्यातील सनगोल्डा येथील घरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता.परफ्युम एक्स्पर्ट व प्रख्यात फोटोग्राफर मोनिका घुरडे यांच्या हत्येआधी आरोपी राजकुमार यानं त्यांच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार करण्याआधी त्यानं घुरडे यांना जबरदस्तीनं पॉर्न क्लिप दाखवल्या,’ असंही चौकशीत उघड झालं आहे.

घुरडे यांच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी रविवारी सोसायटीचा सुरक्षारक्षक राजकुमार याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. गोव्याचे पोलीस महानिरीक्षक विमल गुप्ता यांनी राजकुमार याच्या कबुलीजबाबाची माहिती दिली. मोनिका यांना जिवे मारण्याचा आरोपीचा हेतू नसावा. चुकून त्याच्या हातून हे कृत्य घडले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, चौकशीतून काही वेगळेच सत्य बाहेर आले. मोनिका घुरडे यांना जिवे मारण्याचं आरोपीनं आधीच ठरवलं होतं,’ असं गुप्ता यांनी सांगितलं.

 सेक्युरिटी सुपरवायझर असल्याचं सांगून राजकुमारनं घुरडे यांचा दरवाजा ठोठावला. घुरडे यांनी दरवाजा उघडताच तो बळजबरीनं घरात घुसला आणि त्याच्याकडील चाकू घुरडे यांच्या गळ्याला लावला. घुरडेंनी सुटकेचा प्रयत्न करताच त्यानं त्यांचं तोंड बांधलं आणि त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेला. या धक्क्यानं घुरडे यांची शुद्ध हरपली. त्यानंतर राजकुमारनं त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्या असहाय असल्याचं पाहून त्यानं पैशाची मागणी केली. घुरडे यांनी पर्समधील चार हजार रुपये, एटीएम कार्ड व पिन नंबर लगेचच देऊन टाकले. त्यानंतरही आरोपीचं समाधान झालं नाही. त्यानं घुरडे यांचा मोबाइल घेतला. त्याचा पासवर्ड मागितला. पासवर्ड मिळताच त्यानं मोबाइल इंटरनेटवरून घुरडे यांना बळजबरीनं तीन पॉर्न क्लिप दाखवल्या व त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर अत्यंत निर्दयपणे त्यांचा खून केला, असं विमल गुप्ता यांनी सांगितलं. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

आरोपीनं घुरडे यांच्या घरी दाढी केल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांना घरात काही केस मिळाले असून केसांचे नमुने डीएनएसाठी पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, राजकुमार याला स्थानिक न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *