facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / वांद्र्यात चार मजली झोपडी पडून ६ जणांचा मृत्यू

वांद्र्यात चार मजली झोपडी पडून ६ जणांचा मृत्यू

मुंबई : वांद्रे पूर्वमधील बहरामपाडा परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चार मजली झोपडीचा भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत आएशा अकबर खान या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील वांद्र्याच्या बहराम पाडा परिसरात चार मजली झोपडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. मृतांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. याशिवाय काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि काही अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तसंच मदतीसाठी एनडीआरएफची एका पथकालाही बोलावण्यात आलं आहे.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *