facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / ‘नोट ७’ चं उत्पादन बंद : सॅमसंग संकटात

‘नोट ७’ चं उत्पादन बंद : सॅमसंग संकटात

आवाज न्यूज नेटवर्क

सेऊल : गेली काही वर्षं भारताच्या मोबाइल बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंग कंपनीला उतरती कळा लागण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. गॅलेक्सी नोट ७ या नव्याकोऱ्या स्मार्टफोननं त्यांना ‘जोर का झटका’ दिला आहे. या हँडसेटला आग लागण्याचा सिलसिला थांबतच नसल्यानं कंपनीनं नोट ७ चं उत्पादन थांबवल्याचं कळतं. ही कंपनीवरील मोठी नामुष्कीच मानली जातेय.
१९ ऑगस्टला सॅमसंगनं आपला बहुचर्चित नोट ७ स्मार्टफोन लॉन्च केला होता. अपेक्षेप्रमाणेच त्यावर सॅमसंगप्रेमींच्या उड्या पडल्या. अॅपलच्या आयफोन-७ पेक्षा आपलं नाणं खणखणीत असल्याचं कंपनीला वाटू लागलं. पण काही दिवसांतच, चार्जिंग करताना नोट ७ ने पेट घेतल्याच्या बातम्या जगभरातून आल्या आणि हे सगळे फोन सॅमसंगला परत घ्यावे लागले. त्या बदल्यात कंपनीनं ग्राहकांना नवे हँडसेट दिले, पण त्याची बॅटरीही तापत असल्याच्या तक्रारी आल्या.

५ ऑक्टोबरच्या घटनेनं तर सॅमसंगची मोठीच बदनामी झाली. साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात नोट ७मधून धूर येत असल्याचं सगळ्यांनी पाहिलं. २१ सप्टेंबरला खरेदी केलेला हा स्मार्टफोन स्वीच-ऑफ असतानाही पेटल्यानं यूजर्सनी धसका घेतला आणि कंपनीला दणका बसला. त्यानंतर एटीअँडटी आणि टी-मोबाइल या दोन बड्या अमेरिकी कंपन्यांनी नोट ७च्या विक्री आणि अदलाबदल बंद केली. त्यामुळे सॅमसंगनं नोट ७ चं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द. कोरियातील योन्हाप न्यूज एजन्सीनं दिलं आहे.
चकाचक आणि टकाटक ‘पिक्सल’ स्मार्टफोन घेऊन गुगल मोबाइल बाजारात उतरली असताना, नोट ७च्या आगींमुळे सॅमसंग कंपनी धुरातच हरवली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *