facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / उद्धव ठाकरेनची जळगाव मध्ये सभा
uddhav-thackeray

उद्धव ठाकरेनची जळगाव मध्ये सभा

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव-

 

आम्हाला साथ देणाऱ्या जनतेला शिवसेना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय हा शिवसेना आमदारांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाल्याचा दावाही उद्धव यांनी केला.शिवसेनेची तोफ मंत्रिपदाचे पाणी शिरल्यामुळे निकामी होणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले.अन्याय होईल तिथे शिवसेना सरकारची साथ देणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधी राग आळवला. ते गुरूवारी जळगावच्या पाचोरा येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली तरी सत्ताजमा होणार नाही असे ठासून सांगितले.

शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असे म्हणतात. यामध्ये कितपत तथ्य आहे हे माहित नाही. मात्र, इतके दिवस तुम्ही सत्तेत होता, पंतप्रधानपद तुमच्या मित्रपक्षाकडे होते. त्यामुळे सोनिया गांधींच्या घरी पाणी भरताना पवारांना मराठा आरक्षणाचा मुद्दा आठवला नाही का, असा खोचक सवाल यावेळी उद्धव यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांसारखे नेते शब्दांची फिरवाफिरवी करतात, सातत्याने भूमिका बदलतात. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी उद्धव यांनी पुन्हा एकदा केली. जेणेकरून संबंधितांना आपली भूमिका किंवा शब्द फिरवात येणार नाहीत, असे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान, या जाहीर सभेत माजी आमदार सुरेश जैन यांची मंचावरील उपस्थिती लक्षणीय ठरली. काही दिवसांपूर्वीच सुरेश जैन यांची जामिनावर सुटका झाली होती. सुरेश जैन हे राजकारणाचा बळी ठरले. त्यांच्याविरोधात खालच्या पातळीवरचे राजकारण झाल्याचे उद्धव यांनी भाषणादरम्यान सांगितले. तसेच शिवसेना नेहमी त्यांच्या पाठिशी उभी राहिल, असेही उद्धव यांनी सांगितले. दरम्यान, जळगावमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि सुरेश जैन यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. सुरेश जैन यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी गिरीश महाजन यांच्याबरोबरही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *