facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / भक्तिमय वातावरणात जेजुरी दसरा साजरा केला ! पहा PHOTO
14717313_10154465419637936_4805667887324754931_n

भक्तिमय वातावरणात जेजुरी दसरा साजरा केला ! पहा PHOTO

आवाज न्यूज नेटवर्क

जेजुरी

जेजुरीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता खंडोबा गडावर मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना देताच मानकऱ्यांनी पालखी खांद्यावर उचलून घेतली. भंडारघरातून सातभाई व बारभाई पुजारी यांनी खंडोबा व म्हाळसादेवीच्या मूर्ती आणून पालखीत ठेवल्या.  हजारो भाविकांच्या भक्तिभावाला आलेले उधाण.. मधूनच सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष.. रात्रीला भेदून आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा.. दरीमध्ये घुमणारा फटाक्यांचा आवाज.. अशा वातावरणात खंडोबाच्या सेवेतून साजरा झालेला पारंपरिक भेटाभेटीचा सोहळा पाहाण्यासाठी जेजुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी बुधवारची सारी रात्र डोंगरातच घालविली.सर्वत्र भंडारा व सोने उधळल्याने ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या उक्तीचा साऱ्यांना प्रत्यय आला. ही पालखी नंतर डोंगर दरीतील रमणा या ठिकाणी नेण्यात आली.

14713766_540065526204602_2743205391940130979_n

 

 

 

 

 

 

 

 

 

पारंपरिक वाद्ये वाजवीत, फटाक्यांची आतषबाजी करीत पालखी पुढे सरकत होती. दोन्ही पालख्यांसमोर हवाई नळे, भुईनळे मोठय़ा प्रमाणामध्ये उडविण्यात आले. नगरपालिकेसमोर उभ्या केलेल्या रावणाचे दहन बुधवारी पहाटे करण्यात आल्यानंतर पालखीसमोर प्रचंड फटाके उडविण्यात आले.

मुस्लीम बांधवांनी फुलांच्या पायघडय़ा घालून पालखीचे स्वागत केले. पानसरे परिवाराने पानाचा विडा देवाला अर्पण केला. पहाटे धनगर बांधवांनी खंडोबा गडाच्या पायथ्याशी सुंबरान मांडले होते. जुन्या धनगरी ओव्या व गाणी म्हणण्यात आली. पालखीने गडामध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक कलावंतांनी देवापुढे गाणी, लावण्या, सोले म्हणून हजेरी लावली. पालखी नाचवत खेळवत भंडारघरात नेण्यात आली. तेथे रोजमोरा (ज्वारी) वाटप झाले. खंडा स्पर्धा झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता दसरा सोहळ्याची सांगता झाली.रमण्यामध्ये कडेपठारची पालखी व खंडोबा गडातील पालखी यांची भेट रात्री अडीच वाजता झाली. तरुणांच्या सहभागाने व उत्साहाने झालेला जेजुरीचा हा मर्दानी दसरा तब्बल सोळा तास सुरू होता.

 

14642298_10154465419272936_3205147718108510712_n

 

 

 

 

 

 

 

खंडा उचलणे स्पध्रेत अमोल खोमणे प्रथम

जेजुरीत बुधवारी सकाळी आठ वाजता पुजारी विलास बारभाई व विश्वस्तांनी खंडा पूजन केल्यावर मोठय़ा उत्साहत स्पर्धा सुरू झाली. खंडा उचलणे स्पध्रेत अमोल खोमणे याने तब्बल १६ मिनिटे २२ सेकंद तलवार एका हातात उचलून धरली. एका हातात तलवार पकडून ती युद्धात फिरवता तशी फिरवणे, दातात तलवार धरून उठाबशा काढणे, करंगळीने तलवार उचलणे, मनगटावर तलवार तोलून धरणे आदी कसरती या वेळी करण्यात आल्या. विजेत्यांना खंडोबा देवस्थानतर्फे रोख रक्कम व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.गडामधील खंडा शुद्ध पोलादापासून बनवलेला असून तो पेशवाईच्या काळात सोनोरीचे सरदार रामराव व महीपतराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केला आहे. सरदार पानसे यांचे वंशजही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पानसे परिवाराकडून विजेत्यांना देण्यात आली.

14729175_10154465419642936_6467838606202279881_n

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *