facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / पंढरपूर मध्ये डेंगू ने घातले थैमान -संतप्त लोकांनी घातले आरोग्य कक्षाला टाळे

पंढरपूर मध्ये डेंगू ने घातले थैमान -संतप्त लोकांनी घातले आरोग्य कक्षाला टाळे

आवाज न्यूज नेटवर्क –

प्रतिनिधी- नागेश सुतार – आरोग्य कक्षाला ठोकले टाळे – 

पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात डेंग्यू च्या साथीने थैमान घातलंय . पण पंचायत समिती आणि  आरोग्य विभागाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने मेंढापूर मधील तरुणाचा बळी  गेलाय. सुस्त  प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा निषेध करत, ग्रामस्थ आणि युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी तालुका आरोग्य विभागाच्या कक्षास टाळे  ठोकले .
मागील काही दिवसापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात डेंग्यू आजाराने अनेक नागरिक त्रस्त आहेत. अनेक रुग्ण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण पंढरपूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सुस्त झाली आहे. पंचायत समितीचा आरोग्य विभाग मधील अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवतात, पण उपाययोजना मात्र काहीच होत नाहीत.

नुकताच पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर मधील २२ वर्षीय हिम्मत पाटील या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारादरम्यान  मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना डेंग्यू साथी बाबत  विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे .

सुस्त अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आज पंचायत समिती कार्यलयात ग्रामस्थ आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कक्षास टाळे  ठोकले, बेजबाबदार अधिकाऱ्यांचा घोषणा देत निषेध करण्यात आला .

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *