facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर मध्ये हटके बॅनर

मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर मध्ये हटके बॅनर

आवाज न्यूज नेटवर्क – 

कोल्हापूर :शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे. “मोर्चाला याला लागतंय”, “अहं!! या नाही यायचंच” अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी अस्सल रांगड्या पद्धतीने तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरुन याचा प्रत्यय येतो.

दरम्यान, कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी मोर्चाची जोरदार तयारी केली आहे. मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंगची ठिकाणं सोशल मीडियावरुन नागरिकांना कळवण्यात आली आहेत.

कोल्हापुरातील फ्लेक्सची सध्या महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा सुरु आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *