facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / नेहरू स्टेडियमच्या टेंडरवरून गदारोळ
nehru-stadium-pune

नेहरू स्टेडियमच्या टेंडरवरून गदारोळ

आवाज न्यूज नेटवर्क – 

पुणे : स्वारगेट येथील महापालिकेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये काम करण्यासाठी केवळ ७५ लाख रुपयांची तरतूद असताना येथे आठ कोटी रुपयांचे टेंडर कसे काढले, असा प्रश्न उपस्थित करत सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रशासनाला गुरुवारी धारेवर धरले. याबाबत तांत्रिक चुका झाल्याची कबुली प्रशासनाने दिली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले.
नेहरू स्टेडियमवर गेल्या अनेक  वर्षात एकही आंतराष्ट्रीय क्रिकेटचा सामना झालेला नाही. तसेच दहा वर्षात रणजी सामना देखील या मैदानावर झालेला नाही. तरीही, स्टेडियमवरील खेळपट्टी आणि मैदानाभोवती अशी दुहेरी आणि महागडी विद्युत व्यवस्था करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. खेळपट्टी आणि मैदानाभोवती विद्युत व्यवस्था करण्यासाठी बजेटमध्ये केवळ ७५ लाखाची तरतूद होती. असे असताना आठ कोटीचे टेंडर का काढले असा सवाल विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. शहराच्या करदात्याची ही एक प्रकारे लूट असून संघटित गुन्हेगारी असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. गरज नसताना या स्टेडियमवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च कोणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, अशी विचारणा करत सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणामध्ये नियमांचे उल्लंघन झाले असून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने  निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक अशोक येनपुरे, अविनाश बागवे, मुक्ता टिळक यांनी केली. या प्रकरणाचा खुलासा करताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, ‘या स्टेडियमवर गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. मात्र, खेळाडूंना सायंकाळी सराव करता यावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून त्या दर्जाची विद्युत व्यवस्था उभारण्याचे काम करण्यात.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *