facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / पुण्यातील चेन स्नॅचरला अटक ,८ लाखाचा माल जप्त
chain-compressed-580x395

पुण्यातील चेन स्नॅचरला अटक ,८ लाखाचा माल जप्त

आवाज न्यूज नेटवर्क – 

पुणे: मम्मू ऊर्फ मोहम्मद अली उर्फ अजिज इराणी असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे.पुण्यातील चेन स्नॅचिंगच्या 59 गुन्ह्यातील फरारी आरोपीला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलं आहे.

59 चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली असून आता पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. या कारवाईत कोथरूड, अलंकार, वाकड, मार्केटयार्ड, सांगवी, शिवाजीनगर, विश्रामबाग, सिंहगडरोड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या चेन स्नॅचरकडून पोलिसांनी 7 लाख 83 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. लोणी काळभोर येथील हा आरोपी ओदिशातील असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ओदिशातून अटक करुन पुण्यात आणलं.

 

 

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *