facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / काश्मीर मध्ये फडकला चीनचा झेंडा

काश्मीर मध्ये फडकला चीनचा झेंडा

जम्मू काश्मीरमध्ये बुरहान वानी या दहशतवाद्याला चकमकीत कंठस्नान घालण्यात आले होते. तेव्हापासून काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असून सलग १०० दिवसांपासून हिंसाचाराने काश्मीर खोरे धूमसत आहे. शुक्रवारी बारामुल्ला येथे नमाज झाल्यावर काही तरुण रस्त्यावर उतरले. या तरुणांनी चेहरा झाकून घेतला होता. भारताविरोधात घोषणाबाजी करत या तरुणांनी पाकिस्तानचे झेंडे फडकावले. मात्र त्यासोबतच यातील ३ ते ४ तरुणांनी चीनचे झेंडेही फडकावले. यापैकी एका झेंड्यावर चीनकडून मदती हवी अशा आशयाचा संदेश लिहीला होता. या तरुणांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत आंदोलकांना पांगवले.

जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी आंदोलनादरम्यान चीनचे झेंडे फडकावण्यात आले आहेत. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आंदोलनादरम्यान पाकिस्तानसोबत चीनचे झेंडे फडकावण्यात आले असून चीनने मदत करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये आंदोलनादरम्यान पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पण आता थेट चीनचेही झेंडे या आंदोलनात झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौ-यावर असतानाच काश्मीरमध्ये चीनचे झेंडे फडकावण्यात आले आहेत. मात्र भारतासाठी ही एक धोक्याची घंटा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी पाकिस्तानशिवाय इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडेही काश्मीरमध्ये फडकावण्यात आले होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *