facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / जळगावच्या पाणी प्रश्न अखेर सुकर

जळगावच्या पाणी प्रश्न अखेर सुकर

जळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी २४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी काढलेल्या निविदांना मक्तेदारांकडून प्रतिसाद  न मिळाल्याने योजना रखडली होती. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीनुसार शासनाने निविदेतील जाचक अटी शिथील केल्याने या योजनेचा मार्ग सुकर झाला आहे. विशेष म्हणजे शासनाने अमृतमधूनच उद्यानासाठी प्रस्ताव जळगाव मनपाकडून मागविला आहे.

जळगाव महापालिकेच्या पाणीपुरवठा याजेनेचा २४६ कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव शासानाने स्विकारून जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश केला. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला १२४ कोटी रुपयांचे अुनदान मंजूर झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १९१ कोटी रुपयांच्या कामांची ‌निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ४५ दिवसात केवळ दोनच एजन्सींनी प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी नियमानुसार तीन निविदा आवश्यक असल्याने फेरनिविदा काढण्यात आली. त्यानंतर तीन वेळा सात दिवस याप्रमाणे २१ दिवसांची मुदत देऊनदेखील प्रतिसाद मिळला नाही.

जाचक अटी शिथील
या निविदेमध्ये असलेल्या जाचक अटींमुळेच मक्तेदारांमध्ये उदासिनता असल्याचे शहर अभियंता दिलीप थोरात यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला पत्र देऊन या अटी शिथील करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार शासनाने आता बँक गॅरंटी व सुरक्षा अनामत या दोघींपैकी सुरक्षा अनामत रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रॉडगेजमधून पाइप जाणार असल्याने त्यासाठी आधी ६५० डाय मीटरचा अनुभव आवश्यक हाता, तो आता ४५० मीटर इतका करण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *