facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / पुरंदर मधील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

पुरंदर मधील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

आवाज न्यूज नेटवर्क –

पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. १९७२ च्या भीषण दुष्काळातही पुरंदरच्या ग्रामस्थांनी गाव सोडलेही नाही ,जमिनीही विकल्या नाहीत. पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे आता चांगले दिवस आल्याने विमानतळासाठी एक इंचही जागा देणार नाही, असा निर्धार पुरंदरमधील  शेतकऱ्यांनी केलाय.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला विरोध करण्यासाठी पारगाव, राजेवाडी, आंबळे, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि वाघापूर या सात गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. त्यानंतर जाहीर सभेत मनसेच्या शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे तसेच प्रदीप पोमण, माणिक पाटील, दत्ताशेठ झुरंगे, सर्जेराव मेमाणे, सुदाम इंगळे, कांता राऊत, गौरी कुंजीर आदींनी विमानतळाच्या विरोधात सूर  काढला.

आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीमंतांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. लोकसंख्येच्या केवळ दोन टक्केच लोक विमानाने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने विमानतळासाठीचे पैसे सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेवर खर्च करावेत, असा सल्ला जाधवराव यांनी दिला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुरंदरमध्ये विमानतळ करण्याचा घाट घातला गेला आहे. पुरंदरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येत्या आठ दिवसांत विमानतळाचा निर्णय रद्द  करावा, अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा टेकवडे यांनी या वेळी दिला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *