facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / म्हाडा गृहप्रकल्पांच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ

म्हाडा गृहप्रकल्पांच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) मोरवाडी, म्हाळुंगे आणि वानवडीसह आठ ठिकाणी विकसितकरण्यात येणाऱ्या सदनिका आणि भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता चार नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
‘ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी चार ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यामध्ये वाढ करून चार नोव्हेंबर करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी दोन नोव्हेंबरला रात्री १२ वाजण्यापूर्वी रजिस्ट्रेशन केले पाहिजे. त्यानंतर तीन नोव्हेंबरला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आणि चार नोव्हेंबरपर्यंत अनामत रक्कम भरणे अत्यावश्यक आहे’, असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी अशोक काकडे-देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आतापर्यंत ३६ हजार ७१३ नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले असून, त्यापैकी २१ हजार ९०६ जणांनी पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापूर्वी अनामत रक्कम म्हणून सदनिकेच्या किमतीच्या सुमारे दहा टक्के रक्कम भरावी लागत होती. आता अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनामत रक्कम ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारेही (डीडी) भरता येणार आहे’, असे काकडे-देशमुख यांनी स्पष्ट केले.
‘यापूर्वीच्या प्रक्रियेनुसार लॉटरीमध्ये सदनिका न मिळालेल्यांना अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज करावा लागत होता. आता अर्ज करण्याची गरज नाही. संबंधित अर्जदारांची अनामत रक्कम सात दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

२४ नोव्हेंबरला लाइव्ह सोडत
‘सदनिकांसाठी २४ नोव्हेंबरला पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सोडत होणार आहे. ही प्रक्रियादेखील ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. ही सोडत ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर लाइव्ह दिसणार आहे. सोडतीच्या ठिकाणी अर्जदारांनी येण्याची आवश्यकता नाही. त्यांना  घरबसल्याही सोडत पाहता येणार आहे. www.mhada.gov.in या वेबसाइटवर सोडत दिसणार आहे  तसेच लॉटरीत सदनिका मिळालेल्यांना त्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाणार आहे , असे काकडे – देशमुख यांनी सांगितले.

प्रकल्पाचे ठिकाण सदनिकांची संख्या
म्हाळुंगे १४१३
मोरवाडी ८४५
वानवडी ८२
शिवाजीनगर, सोलापूर ४७
जुळे सोलापूर ७२
दिवे ४०
सासवड ४
वाठार निंबाळकर ६७ (भूखंड)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *