facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / आर्ची-परश्याच्या लातूरमध्ये होणारा कार्यकम रद्द
sairat-akash-rinku

आर्ची-परश्याच्या लातूरमध्ये होणारा कार्यकम रद्द

आवाज न्यूज नेटवर्क

लातूर: 

लातूरमधील शाळेच्या मदत निधीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, क्रीडा संकुलावरच्या मैदानावर खड्डे पडल्यामुळे या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती समजते आहे. या कार्यक्रमाला आर्ची, परशासह सैराटची टीम येणार होती.

लातूरच्या क्रीडा संकुलात ‘सैराट’च्या टीमचा उद्या होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समजते आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यानं हा कार्यक्रम रद्द केला असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सैराटच्या टीमसोबत ‘चला हवा येवू द्या’ची टीम देखील येणार होती.

कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यान कार्यक्रम रद्द करत असल्याचं कारण शाळेच्या वतीनं देण्यात आलं आहे. दुसरीकडे या कार्यक्रमाला छुपा विरोध असल्यानं कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *