facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / इंदापूरला दोन गटांत मेसेज मुले झाली हाणामारी
images-1

इंदापूरला दोन गटांत मेसेज मुले झाली हाणामारी

आवाज न्यूज नेटवर्क

इंदापूर :  शहरातील शेख मोहल्ला भागात किशोरवयीन मुलांच्या दोन गटांत हाणामारी होऊन सात ते आठ जण जखमी झाले आहेत.तीन-चार वर्षांपासून मुलांच्या गटात कुरबुरी होत आहेत. मोहरमच्या दिवशी हा बाचाबाचीचा प्रकार घडला होता.

आज सायंकाळी एकाला कसला तरी मेसेज आला. त्या मेसेजमुळे झालेला वाद वाढत गेला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काठी, वीट, दगडांनी एकमेकांना मारहाण झाली.

यात ते जखमी झाले असून, जवळपास सात ते आठ जणांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *