facebook
Thursday , December 8 2016
Home / नागपूर / कॅट व्यापारी संघटनेने चालु केले ‘डिजिटल भारत’
कॅट डीजीटल

कॅट व्यापारी संघटनेने चालु केले ‘डिजिटल भारत’

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर –

‘कॅट’ ही देशभरातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना आहे. २० हजार व्यापारी संघटना जवळपास ५ कोटी व्यापारी संघटनेशी संलग्नित आहेत. संघटनेकडून व्यापाऱ्यांचे केंद्र सरकारपर्यंत लावून धरले जातात. ‘मुद्रा’ योजना कॅटच्या प्रयत्नातूनच अस्तित्वात आली आहे. यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विदेशी ऑनलाइन कंपन्यांचा विषयदेखील कॅट केंद्रापर्यंत लावून धरत आहे. यासोबतच किरकोळ व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘डिजिटल भारत आघाडी’ ही मोठी मोहीम आता कॅटने हाती घेतली आहे.

 आगामी काळ हा ‘डिजिटल’चा आहे. यामुळे सर्वच व्यापार हळूहळू ऑनलाइन होणार आहे. बहुतांश व्यवहार त्या दिशेने सुरू आहेत. यामुळे आता डिजिटल व्यवहारांपासून दूर असलेल्या देशातील ७० टक्के व्यापाऱ्यांना या प्रवाहात आणण्याचा निर्णय अ. भा. व्यापारी महासंघाने (कॅट) घेतला आहे. यासाठी ‘डिजिटल भारत’ आघाडी संकेतस्थळाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सिथारमन यांनी
उद्घाटन केले.

 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, ‘देश झपाट्याने डिजिटलकडे जात आहे. आमचा विरोध डिजिटल भारत या अभियानाला नाही. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विदेशी कंपन्यांना आमचा विरोध आहे. यासोबतच किरकोळ व्यापाऱ्यांनादेखील आधुनिक बाजारात आणण्याची गरज आहेच. यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्यासाठी विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. देशातील ७० टक्के किरकोळ व्यापारी आज डिजीटलायझेशनपासून दूर आहेत. त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल.’

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *