facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / जयललिताचे फोटो ठेऊन चालते कामकाज
jaya

जयललिताचे फोटो ठेऊन चालते कामकाज

आवाज न्यूज नेटवर्क

चेन्नई  –

जयललिता यांच्या आदेशाशिवाय तामिळनाडू सरकारचं पानही हलत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अम्मा सांगतील ते आणि सांगतील तसं करायचं, अशीच शपथ तिथल्या मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे जयललिता यांच्या अनुपस्थितीत राज्यशकट हाकताना अण्णा द्रमुकच्या मंत्र्यांचा गोंधळ उडालाय. २२ सप्टेंबरपासून जयललिता हॉस्पिटलमध्ये आहेत. फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीविषयी उलटसुलट चर्चांमुळे तामिळनाडूत काळजीचं वातावरण आहे. त्याचा परिणाम राज्य सरकारच्या कामगिरीवरही झाला आहे. परंतु आता राज्यातील मंत्री अजब शक्कल लढवून महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.

 ‘अम्मा’ म्हणूनच देशभरात ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांना त्यांचे मंत्री देवीच मानतात, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गेले तीन आठवडे जयललिता हॉस्पिटलमध्ये असल्यानं, तामिळनाडूच्या मंत्रालयात सध्या सर्व निर्णय जयाअम्माचा फोटो अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ठेवूनच घेतले जात आहेत. हा प्रकार पाहून अनेकांना, भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केल्याच्या प्रसंगाचीच आठवण होतेय. सगळं काही अम्माच्या डोळ्यांदेखत सुरू असल्याचं समाधान मिळावं म्हणून निष्ठावंतांनी हा मार्ग निवडला आहे.
जयललिता यांची सर्व खाती त्यांचे निष्ठावान ‘भक्त’ वित्तमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यांनी हळूहळू बैठका घेण्यास सुरुवात केली असून या बैठकांदरम्यान जयललिता यांचा फोटो डेस्कवर किंवा खुर्चीवर ठेवूनच निर्णय घेतले जातात. या बैठकांचे फोटो माहिती-जनसंपर्क विभागातर्फे प्रसिद्ध केले जात आहेत. विशेष म्हणजे, सगळं काही मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये होत आहे, अशी कॅप्शन या फोटोसोबत आवर्जून दिली जातेय. आता हेही मुख्यमंत्र्यांच्या, अर्थात अम्माच्या आदेशावरूनच होतंय का, हे कळू शकलेलं नाही.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *