facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / जेवणातून एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा
download

जेवणातून एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी  

शेजाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पाच जणांचे जीव वाचले

हा प्रकार चिंचवड, काळभोरनगरमध्ये शुक्रवारी  घडली.  रात्री केलेल्या जेवणातून एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.  जाहीर हुसेन अन्सारी (32), नसीम अन्सारी (30), लैला खातून अन्सारी (28), वरीस नसीर अन्सारी (5) आणि अल्फिया नसीर अन्सारी (6)  अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ( 13) रात्री अन्सारी कुटुंबीयांचे जेवण झाल्यानंतर सर्वांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. काही वेळातच कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध पडले. शुक्रवारी अन्सारी कुटुंबातील एकही व्यक्ती बाहेर आला नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता हे सर्वजण निपचित पडल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून या सर्वांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Check Also

news-14

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *