facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ज्यांच्या कडे पैसा त्यांचीच आंदोलने मोठी – राजकुमार बडोले
download

ज्यांच्या कडे पैसा त्यांचीच आंदोलने मोठी – राजकुमार बडोले

आवाज न्यूज नेटवर्क

औरंगाबाद-

सध्या राज्यभरात निघत असलेल्या मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर बडोले यांनी हे विधान केले. कोपर्डीच्या नावाखाली वा अन्य कोणत्याही कारणाने आमच्या अनुसूचित जातीच्या बांधवांवर अन्याय होणार असतील तर सामाजिक न्यायमंत्री म्हणून मी राजीनामाही देईन, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्यांच्याकडे अधिक पैसा असतो, त्यांच्या मोर्चातील गर्दी वाढते.  असे म्हणत त्यांनी मराठा मोर्चांना लक्ष्य केले. त्यामुळे आता बडोले यांच्या या विधानावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आज पैसेवाल्यांची आंदोलने मोठी होत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते शुक्रवारी औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनात बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. वेरुळ महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना जायचे असल्याने ते निघून गेल्यानंतर बडोले यांनी ही भूमिका मांडली.
हिंदू विवाह कायद्यातून शीख आणि जैन यांचा विवाह कायदा वेगळा झाला आहे. बौद्धांचा विवाह कायदा करण्यासाठी बैठकाही घेतल्या आहेत. त्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बडोले यांच्या भाषणाचा संदर्भ घेतला. ‘मी आता केंद्रात आहे. कें द्रात नवबौद्धांच्या आरक्षणाबाबत शासन निर्णय काढण्यास काही तांत्रिक अडचणी आहेत, पण काळजी करू नका,’ असे आठवले म्हणाले. या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेतील अधिकारांची पायमल्ली होऊ देणार नाही. इतर समाजाचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सरकार समन्वयाने सोडवेल, असे या वेळी सांगितले.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *