facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / मराठा मोर्चामुळे ठाण्यात वाहतूक वेवस्था कोलमडणार ?
ccc

मराठा मोर्चामुळे ठाण्यात वाहतूक वेवस्था कोलमडणार ?

ठाणे : उद्या, रविवारी ठाणे शहरात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव एकवटण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरात अभूतपूर्व जनसागर त्यानिमित्ताने लोटण्याची शक्यता असून शहरातील सर्व रस्त्यांवरील गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय लोकलगाड्यांवरही रविवारी मोठा ताण पडणार आहे. मोर्चेकऱ्यांची कुठेही कोंडी होऊ नये यासाठी समन्वय समितीच्या वतीने नियोजनबद्ध सूचना दिल्या जात आहेत.
उद्या, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तीन हात नाका येथून निघणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मात्र, मोर्चेकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत या मार्गावरील रस्ते अपुरे पडण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने येणाऱ्या चहूबाजूंकडील रस्त्यांवरून येण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना करण्यात आले आहे. त्याशिवाय मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला असून शहराच्या वेशीवर वाहनतळ करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्रमुख मैदानांमध्ये मोर्चेकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यादिवशी शहरातील कोणत्याही रस्त्यावर ठाणेकरांना वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरातील वाहनांसाठी पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी सुचविले असले तरी तेदेखील मोर्चेकरी व्यापण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची चिन्हे आहेत. कल्याण, डोंबिवलीपासून ते अगदी कर्जत, कसारापर्यंतचे आंदोलनकर्ते लोकलने ठाण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे लोकलसेवेवरही त्यादिवशी प्रचंड ताण पडणार आहे. वाहतूक कोंडी होऊन मोर्चेकरी अडकू नयेत यासाठी समन्वय समितीच्या वतीने नियोजन केले जात आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *