facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / ‘मिर्झिया’ मधील अभिनेत्री पडली क्रिकेटरच्या प्रेमात
मिर्झिया सयामी खेर

‘मिर्झिया’ मधील अभिनेत्री पडली क्रिकेटरच्या प्रेमात

आवाज न्यूज नेटवर्क
मुंबई –
‘मिर्झिया’ या सिनेमाची अभिनेत्री ‘सयामी खेर’ एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली आहे. ‘कोण आहे हा क्रिकेटर ?’ हा क्रिकेटर दुसरा-तिसरा कुणी नसून ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर’ आहे. सयामी खेर सचिन तेंडुलकरची खूप मोठी चाहती असल्याचे समोर आले आहे. सचिनसाठी काहीही अगदी स्वतःचे कामदेखील मागे सोडायला सयामी तयार आहे. 2013 साली, ‘मिर्झिया’ सिनेमाचे शुटिंग सुरू असताना सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट मॅच पाहण्यासाठी सयामीने दिग्दर्शक राकेश मेहरा यांच्याकडे कामातून 5 दिवसांची सुट्टी देण्याची विनंती केली होती.
‘मिर्झिया’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकल्यानंतर तिने सचिनसाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याचे ठरवले होते.
केवळ ठरवले नाही तर तिने ते प्रत्यक्षात उतरवलेदेखील. सयानीने राकेश मेहरा यांच्यासोबतीने ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणा-या सचिन तेंडुलकरसाठी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. या स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसोबत हजेरी लावली. यावेळी क्रिकेटर झहीर खान आणि अजित आगरकरदेखील उपस्थित होते. दरम्यान, मिर्झिया सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. सिनेमाची कहाणी गोंधळात टाकणारी असल्याने प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवल्याचे समजते आहे. मात्र, हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *